Finance
Tom Martin
Writer
Feb 20, 2025
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्यातील कामगारांना आर्थिक मदत व्हावी म्हणून भारत सरकारद्वारे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेकरिता MAHABOCW या नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या बांधकाम कामगार योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील तमाम बांधकाम मजुरांसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील कामगारांना mahabocw.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कामगार आहात आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीचा तुम्हाला फायदा ग्यायचा असेल तर, तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचा ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजून जाईल.
महाराष्ट्र सरकारकडून दि. १८ एप्रिल २०२० या तारखेला महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत Maharashtra Bandhkam Kamgar Yojana MAHABOCW हे सरकारचे अधिकृत पोर्टल सुरु करण्यात आले होते. या अधिकृत पोर्टलच्या मार्फत महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ होणार आहे. सरकारने हे अधिकृत पोर्टल खास कामगारांसाठी केलेले आहे.
बांधकाम कागमार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कष्ट करणाऱ्या लोकांना २०००/- रु. ते ५०००/- रु. पर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना इतर योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
बांधकाम कामगार योजना ही राज्यात विविध नावानुसार ओळखली जाते. उदा. महाराष्ट्र कोरोना साहाय्य योजना, कामगार साहाय्य योजना आणि महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना इ. साल २०१९ पासून सुरु झालेल्या कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या कामगारांना सरकारतर्फे या योजनेतून आर्थिक मदत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील जवळपास १२ लाख बांधकाम कामगारांना आर्थिकदृष्टया मदत पुरवण्यात आली. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना mahabocw.in या अधिकृत पोर्टलला जाऊन तिथे नोंदणी करायची आहे.
योजनेचे नाव : |
Bandhkam Kamgar Yojana 2024 |
सुरू केली : |
ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचे उद्दिष्ट : |
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे |
विभाग : |
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ |
फायदा : |
५,०००/- रु. आणि भांड्याचा संच |
लाभार्थी : |
महाराष्ट्र बांधकाम कामगार |
राज्य : |
महाराष्ट्र |
अर्जाची प्रक्रिया : |
ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट : |
महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडल अंतर्गत mahabocw.in हे बांधकाम कामगार योजनेचे पोर्टल चालू करण्याचा मुख्य हेतू या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कामगारांना आर्थिक मदत करणे हा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना इतर विविध योजनांचाही लाभ घेता येणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना त्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच कष्टकरी कामगारांना सरकारकडून सुमारे २०००/- रु. ते ५०००/- रु. इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे. या आर्थिक मदतीची रक्कम लाभार्त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर पाठवली जाणार आहे.
✅ बांधकाम कामगारांचे हक्क आणि सुरक्षा मजबूत करून, त्यांचे जीवनमान उंचावू या! 🚀
Read Also: Bandhkam Kamgar Yojana
Read Also: Mahabocw Online Registration & Benefits Complete Guide